पातुरातील कोरोणा हद्दपार करण्यासाठी प्रशासन सरसावले
पातुरातील कोरोणा हद्दपार करण्यासाठी प्रशासन सरसावले
पोलीस विभाग ,महसूल विभाग ,कोरोनापथक आदींनीघेतला ध्यास
पातूर प्रतिनिधी : पातूर शहरातून सुरुवातीला सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती त्यामुळे प्रशासन सुद्धा हादरले होते तर कोरोनाचे संक्रमण वाढणार असल्याच्या दहशतीत नागरिक वावरत होते मात्र पोलीस प्रशासन ,महसूल विभाग , आणि कोरोणा पथक यांनी गेल्या दोन महिन्यापासून शहरासह ग्रामीण भागात मोठी जनजागृती करत नागरिकांना सनीटायजर , प्रतिबंधात्मक उपाय याचे मार्गदर्शन केले शहरांमधून एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळतयानंतर अकोला येथे नेल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित विभाग मोहल्ल्यामध्ये बॅरिगेट्स लावण्यात आले आणि कोरोणाचे संक्रमण वाढू नये यासाठी खबरदारी घेतली त्यामुळे सातही पॉझिटिव रुग्णांचे उपचार घेतल्यानंतर बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले तर त्यांच्या संपर्कातील 31 जणांना कवारनटाईन करूनकोरोना संक्रमण थांबवले शहरांमध्ये लघु व्यावसायिकाकडून आणि नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन काय द्यायचे उल्लंघन होत होते त्यामुळे शहरांमधून कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने पातूर पोलीस निरीक्षक गजानन बायस सिंग ठाकूर तहसीलदार दीपक बाजड, नायब तहसीलदार सय्यद एहसानोद्दीन शीर्ला ग्रामपंचायतीचे कोरोना पथक प्रमुख राहुल उंद्रे, कोरोना संक्रमण वाढू नये आणि कोरोना पातूर शहरातून आणि ग्रामीण विभागातून हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतला पातूर शहरांमध्ये अगोदर नागरिक तोंडाला मासक बांधत नव्हते तसेच शासनाने ठरविलेल्या आपत्तीव्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करीत होते त्यामुळे कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने कारवाई करतमास्क न घालणारे व्यवसायिक ,दुचाकी वाहन धारक, तसेच विनाकारण घराबाहेर पडणारे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला एवढेच नाही तर शहरासह ग्रामीण भागातील आपत्कालीन काळामध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तसेच नागरिकांना विविध आजाराने पछाडलेले असल्यामुळे आणि कोरोना ची दहशत घालण्यासाठी खाजगी दवाखाने ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधालय यांचा पुरेपूर पुरवठा करण्यात प्रशासन प्रयत्नशील राहले पातूर शहरांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण राहू नये यासाठी पोलीस विभागात कडून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तोंडावर मास्क नलावणाऱ्या आणिविनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या वाहनधारकांना दंडात्मक कारवाई करून वठणीवर आणले त्यामुळे शहरांमध्ये कोरोणाची आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळण्यासाठी नागरिकांना भाग पाडले सद्यस्थितीत पातुर शहरामध्ये सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यावसायिकांना आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे किराणा व्यवसायिक शेती विषयक कृषी सेवा केंद्र दुग्धव्यवसाय भाजीपाला विक्रेते यांना मुभा देण्यात आली आहे तसेच एक दिवस आड एक बाजू कडील व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवणे कोरोणा संक्रमण रोखण्यावर नियंत्रण मिळविले जात आहे शहरांमधील हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधा देण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र हॉटेल व्यवसायिकांनी चहा विक्रीचे व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून चहा विक्री करू नये तसेच तंबाखू सिगरेट गुटका पुड्या यांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक कारवाई करण्याचे प्रशासनाकडून ठणकावून सांगितले आहे प्रशासनाच्या कर्तव्य तत्परतेने पातुर शहरात covid-19 कोरोना जनजागृती 100% केले जात असून त्याचे अनुपालन सुद्धा होत असल्याने कोरोना हद्दपार करण्याचा प्रशासनाने घेतलेला ध्यास हा पूर्ण होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत शहरांमधील समी प्लाट ,काशीदपुरा ,आदी भागामधील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने संबंधित पॉझिटिव रुग्णांना उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यातआले असून त्यापैकी एका महिलेचा कोरोना रोगाने मृत्यू झाल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांना पातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मध्ये कोरोना आयसोल्युशन वार्ड मध्ये क्वारर्णटाईन करण्यात आले आहे सर्व परिस्थितीवर प्रशासनाने आपली करडी नजर ठेवत आहे।