अकोल्यात कोरोनाने मृत्यू पावलेले मृत्यूसाठी जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त हेच जबाबदर
अकोल्यात कोरोनाने मृत्यू पावलेले मृत्यूसाठी जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त हेच जबाबदर -
मुस्लिम, दलितवस्ती असलेल्या अकोटफाईल ,नायगाव परिसरातील जनतेला मारण्याची घेतली सुपारी --ऍड नजीब शेख यांचा आरोप
अकोला - सध्या संपुर्ण जगात कोरोना विषाणू ने तांडव सुरू करून लाखों लोकांचे बळी घेतले आहेत त्यामध्ये आपल्या देशातील आणि महाराष्ट्रराज्य सहअकोल्यातील 33 लोकांचा समावेश आहे ही गेलेली बळींची संख्या थांबविण्यासाठी शासनस्तरावर आणि विभिन्न पातळीवर प्रयत्न केले जात आहेत मात्र अकोल्यात याच्या उलट प्रक्रिया सुरू आहे अकोला शहरातील अकोटफाईल,नायगाव परिसरात मुस्लिम व दलित लोकांची संख्या मोठ्या संख्येने आहे हा परिसर पहिलेच स्लॅम असल्याने येथे प्रशासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे असतांनाही येथे मात्र मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी आणि अन्य विविध प्रशासन हे जाणीवपूर्वक येथे कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने करण्यासाठी संपूर्ण शहरातील कोरोना बाधितांना वाचविण्यासाठी वापरलेले साहित्य आणि कचरा या परिसरात आणून टाकत धडपडत असल्याचे दिसून येत आहे अशीच स्थिती निष्काळजी असलेल्या अधिकाऱ्यांमुळेच असल्याचा आरोप सुपरिचित वकील नजीब शेख यांनी केला असून त्यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर जबाबदार अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखलकेली असून या प्रकरणी लवकरच विद्यमान न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
अकोला जिलाधिकारी,मनपा आयुक्त महानगरपालिका, जिल्हा आरोग्य विभाग अधिकारी हे कच्चरा गाड़ीद्वारे कोरोना फैलावन्यासाठी मोठे विघातक प्रयत्न करीत आहेत असा आरोप एड.नजीब शेख यांनी लिखित स्वरूपात केला आहे
सध्या अकोला शहर हे पूर्ण राज्यात चर्चेत आले असून येथील रहिवासी जनतेकडे इतर शहरातील लोक वेगळ्याच भावनेने पाहत आहेत कारण येथे कोरोना बाधितांची वाढत असलेली रुग्ण संख्या आणि कोरोना बाधीत मृतकांची संख्या 33 वर गेली असून दररोज कोरोना बाधितांचे येत असलेले अहवालांमध्ये अकोटफाईल व नायगाव परिसरातील रुग्ण संख्या असतेच असते तरीही या परिसरातील डंपिंग ग्राउंड येथे दररोज मनपाच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या कोरोना बाधीत रुग्णांचा वापरण्यात आलेले कपडे,व इतर साहित्यचा समावेश आहे हे सर्वसाहित्य या परिसरात येत असल्याने अतिसंसर्ग असलेल्या कोरोनाचा घातक संसर्ग अधिक वेगाने फैलावत आहे याकडे जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त आणि इतर जबाबदार अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत म्हणजेच या परिसरातील लोकांना बळी देण्याची सुपारी या अधिकारी यांनी घेतल्यागत हे अधिकारी वागत असल्याचा आरोप सुपरिचित ऍड नजीब शेख यांनी मुख्यमंत्री व जबाबदार विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार केलीआहे
कोरोना नियंत्रित करण्यासाठी सर्वच ठिकाणी स्वच्छता केली जाते आणि निर्जंतुक केले जाते मात्र अकोला शहरातीलच असलेला एक भाग म्हणजे अकोटफाईल आणि नायगाव हा परिसर आणि या परिसरात मुस्लिम आणि दलित समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने या परिसराला स्लॅम हा शिक्का बसलेला आहे आणि त्याचमुळे अकोल्यातील अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लोकांच्या प्राणांशी खेळत आहेत आणि पर्यायाने अकोला शहराचे आणि येथील लोकांचे नाव बदनाम करीत आहेत याकडे वरिष्ठ स्थरावरील लोकांनी वेळीच लक्ष न दिल्यास नाईलाजाने विद्यमान न्यायालयात जाऊन याचिका दाखल करावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.