वृत्तपत्रांना व पत्रकारांना शासनाने मदत करावी
वृत्तपत्रांना व पत्रकारांना शासनाने मदत करावी
अकोला जिल्हा पत्रकार संघाची मागणी
अकोला : जिल्हा स्तरावरील सर्व दैनिक , साप्ताहिक , वृत्तपत्रांची शासनाकडे जिल्हा माहिती अधिकारी मार्फत पाठविलेली , व ३१ मार्च पर्यंत च्या मंजूर झालेल्या जाहिरात बिलांचे पेमेंट तात्काळ सर्व वृत्तपत्रांना देण्यात यावे , कोरोना चे संक्रमण , लॉक डाउन चे काळात अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना, पत्रकारांना शासनाने आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे अशी मागणी अकोला जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे , उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री ना.अजित दादा पवार, माहिती राज्यमंत्री ना.आदिती ताई तटकरे , माहिती व जनसंपर्क महासंचालक दिलीप पांढरपट्टे , विभागीय उपसंचालक रामकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने आदींना ही या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत , लॉक डाउन च्या काळात , कोरोना संक्रमणाच्या परिस्थिती मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जोखीम पत्करून काम करणाऱ्या सर्व प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी ही मागणी अकोला जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांना केलेली आहे , मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्र संपादक, संचालक, पत्रकार आदींच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी आग्रही मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मा.अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब , सरचिटणीस प्रमोद लाजूरकर , चिटणीस संजय खांडेकर , चिटणीस दीपक देशपांडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.