वाडेगाव येथे विनामूल्य भाजीपाला वाटप
वाडेगाव येथे विनामूल्य भाजीपाला वाटप
कोरोना संचारबंदी मध्ये गरजूना वाटप
वाडेगाव (सोहेल पठान)
येथील कृषी माहिती-तंत्रज्ञान केंद्रच्या वतीने रविवार रोजी कोरोना संचारबंदी मध्ये गरजू लोकांना विनामूल्य भाजीपाला वाटप करण्यात आला आहे.
संपूर्ण वाडेगाव शहरात संचारबंदी सुरू असताना अनेक गरजू लोकांना भाजीपाला देणायचे ठरवले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकरी रामेश्वर शंकर सोनटक्के यांनी त्यांनी त्यांच्या शेतात केलेल्या भाजीपाला विनामूल्य देऊन शासन प्रशासनाच्या कामात हातभार लावला आहे .शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटले जाते ते रामेश्वर भाऊ सोनटक्के यांनी दाखवून दिले आहे.हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता
उत्कृष्ट शेतकरी रामा सोनटक्के व त्यांच्या पत्नी नंदाबाई सोनटक्के देवकाबाई सोनटक्के यांनीसुद्धा या उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे
संस्थेचे संतोष सरप , गजानन काळे, राजेश सरप , चंदन माणिकराव सरप, अनंता सोनटक्के, केशवराव सरप, सीताराम श्रीनाथ यांनी या उपक्रमासाठी त्यांची मालवाहू गाडी विनामूल्य दिली आहे. जोपर्यंत हे महामारी चे संकट देशाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत संस्था हा उपक्रम राबवणार आहे तरी या या महत्वाच्या या उपक्रमात ज्या काही दानशूर व्यक्तींना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपला हात पुढे करून संस्थेला हातभार लावावा असे आव्हान संस्थाध्यक्ष अध्यक्ष केशवराव सरप यांनी आहे