पातुरच्या स्मशानभूमीतही सोशल डिस्टंटिंग चा संदेश

पातुरच्या  स्मशानभूमीतही सोशल डिस्टंटिंग चा संदेश
               अभ्युदय फाउंडेशनचा पुढाकार
विडिओ देखने के लिए नीचे दी हुई लिंक पर क्लिक करे।
पातूर  : (फ़रहन अमीन )
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सोशल डिस्टेस्टिंग पाळण्याचे आवाहन केले आहे.  त्याला साद देत  अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पातुरच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टस्टिंग  राखण्याचे आवाहन केले आहे.  त्यासाठी या संस्थेने स्मशानभूमीत  आखणी केली आहे.   समशानभूमीत असा संदेश देणारी ही राज्यातील पाहिली संस्था आहे.   
पातूर शहरातील स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या काम अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने हाती घेतले आहे.  अंत्यविधी साठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्याचे काम ही संस्था सातत्याने करीत आहे.  सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाने केले आहे.   प्रत्येक चौकात किंवा रस्त्यावर पोलीस प्रशासन याबाबतची खबरदारी घेत आहे.  तशीच खबरदारी घेऊन अंत्यविधी साठी येणाऱ्या नागरिकांना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन अभ्युदय फाउंडेशन ही सेवाभावी  संस्था करीत आहे.  यासाठी स्मशानभूमीत तीन फुटाचे अंतरावर चौकट आखून देण्यात आले आहेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी सूचक फलक सुद्धा लावण्यात आला आहे. "येथे यायचे नसेल तर,  घरीच रहा " असा समशानभूमीत लावलेला फलक चर्चेचा विषय बनला आहे.  अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे व सचिव बंटी गहिलोत यांच्या पुढाकारात डॉ. संजयसिंह परिहार,  प्रवीण निलखन,  प्रशांत बंड,  दिलीप निमकंडे आदी पदाधिकारी यासाठी जनजागृती करीत आहेत.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement