पातूर नगरपरिषदेने तयार केले हॅन्ड वॉश स्टेशन


https://www.youtube.com/channel/UCzCPuAqvk0CsMjqrjgtJPFQ

 हात धुवा आणि कोरोनाला प्रतिबंध कराचा संदेश
 पातूर प्रतिनिधी, प्रतिबंध करण्यासाठी पातूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रात हात धुण्यासाठी हँड वाँश स्टेशन तयार केले आहेत.नागरिक या स्टेशनवर हँड वॉशने त्यांचा हात स्वच्छ धूवून कोरोनाला पळविण्याचा संकल्प घेणार आहेत. मात्र नागरिकांनी त्यांचे हात स्वच्छ धुतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे अशी अपेक्षा न.प.तर्फे व्यक्त करण्यात येत आहे.   जगात सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.या विषाणूंचा संसर्ग जास्तीत-जास्त हाता द्वारे होत असल्याचे निदर्शनास आले आहे.यासाठी पातूर नगरपरिषदेद्वारे जास्तीत जास्त वेळा हात धुऊन स्वच्छ करण्याचे सतत सांगण्यात येत आहे.भाजी,किराणा व फळ बाजार,मेडिकल दुकान आदी सार्वजनिक ठिकाणी बरेच जणांना साबणाने हातांना स्वच्छ करणे शक्य होत नाही.ही बाब लक्षात घेऊन पातूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर नगर परिषद च्या वतीने प्रार्थमिक आरोग्य केंद्ररांतर्गत हॅण्ड वॉश स्टेशन तयार करण्यात आले आहे ह्या वेळी न.प.अध्यक्षा सौ. प्रभाताई कोथळकर, उपाध्यक्ष श्री. सैय्यद मुजाहिद इक्बाल, नगर सेवक सैय्यद अहफाजोद्दीन तसेच सर्व नगर सेवक न.प.पातूर, कल्याणी सोळंके, आरोग्य पर्यवेक्षक .मो अफसर, दीपक सुरवाडे, मो. अशफाक, देवेंद्र ढोणे, आदी नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते।
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement