पातूर शहरात अत्यावश्यक सेवा देणाऱ्याना माक्स वाटप
पातूर शहरात अत्यावश्यक सेवा देणाऱ्याना माक्स वाटप
अभ्युदय फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम
पातूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, यांना पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने मंगळवारी पाचशे मास्कचे वाटप करून आपल्या सेवाभावी वृत्तीचा परिचय दिला.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक शहर लॉकडाऊन केले आहे. अशा परिस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी रस्त्यावर उतरणारे पोलीस प्रशासन, पत्रकार, डॉक्टर्स, नर्स, नगरपालिकेचे कर्मचारी, महावितरण, महापारेषणचे कर्मचारी, यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पातूरची अभ्युदय फाऊंडेशन ही संस्था पुढे आली आहे. मंगळवारी या संस्थेच्या वतीने या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले. संपूर्ण पातुरवासीयांच्या वतीने त्यांचे आभार मानले.
सर्वप्रथम पातुर पोलीस स्टेशन येथे ठाणेदार गुल्हाने साहेब यांना मास्क देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील संपूर्ण पत्रकारांना मास्क वितरण करण्यात आले. त्यानंतर शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी झटणारे वीज कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, डॉक्टर, नर्स अशा एकूण पाचशे कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मास्कचे वाटप करण्यात आले. नगर परिषद येथे माजी उपाध्यक्ष राजू उगले यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी विशेष म्हणजे सोशल डिस्टस्टिंग व संचारबंदीचे पालन करीत हा उपक्रम पार पडला.
यावेळी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, प्रशांत बंड, दिलीप निमकंडे, शुभम पोहरे आदींनी माsk चे वाटप केले.