६९ पैकी ४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह; २५ प्रलंबित 

६९ पैकी ४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह; २५ प्रलंबित 

https://www.youtube.com/channel/UCzCPuAqvk0CsMjqrjgtJPFQ
अकोला,दि.२ (जिमाका)- जिल्ह्यात आज (सायं. पाच वा.) अखेर एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) आणखी सात जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत ६९  नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. तर २५ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे २५ जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून १७९ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ५५ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर ९८ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर २५ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत. दरम्यान तब्लिगी जमात मरकस च्या दिल्ली येथील कार्यक्रमातून  जिल्ह्यात आलेल्या दहा जणांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यातील प्रत्यक्षात जिल्ह्यात आलेल्या व त्यांच्या संपर्क क्षेत्रातील असे आठ व्यक्तिंचा शोध प्रशासनाने लावला आहे. त्यातील सहा जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आहेत. उर्वरित दोघे हे दिल्ली येथेच असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचा अहवाल हा दिल्ली राज्य सरकारला पाठवला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement