एमएसईबी अभियंता पतसंस्थेकडून गरजूंना किरणा साहित्यासह धान्य वाटप

एमएसईबी अभियंता पतसंस्थेकडून गरजूंना किरणा साहित्यासह धान्य वाटप 

पातूर येथील महावितरण उपकार्यकरी अभियंता संतोष खुमकरांचा पुढाकार 

पातूर :- (फरहान अमीन)
             एमएसईबी अभियंता सहकारी पतसंस्था अकोला व सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन कडून गोरगरीब व गरजू आदिवासी नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 
        कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आल्याने उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मोलमजुरी सुद्धा करता येत नाही. परिणामी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले. ही बाब लक्षात घेऊन समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या एमएसईबी अभियंता सहकारी पतसंस्था अकोला चे अध्यक्ष संतोष खुमकर व सबॉर्डिनेट इंजीनियर्स असोसिएशन चे सहसचिव, प्रवीण राऊत, धीरज गादे व दत्ता शेजोळे यांच्या पुढाकारातून पातुरात तालुक्यात  गोरगरीब आदिवासी नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. आलेगावच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहा चव्हाण यांच्या हस्ते हे  वाटप करण्यात आले. पातूर तालुक्यातील आलेगाव, जांब, पाचरण, उंबरवाडी, कार्ला परिसरातील शेतात असलेले मजूर, मेंढीवाले, पंचाई  आदी गरजू लोकांना किराणा व अन्यधान्य वाटण्यात आले. या सामाजिक  कार्यासाठी नागरिकांनी असोसिएशन व पतसंस्थेचे आभार व्यक्त केले.

अकोला शहरातही केले होते मदतीचे योगदान

एमएसईबी अभियंता पतसंस्था व सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन कडून अकोला शहरातील गोरगरिबांना सुद्धा धान्य वाटप करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. बैदपुरा परिसरात गहू, तांदुळाचे वाटप पाठविण्यात आली होती, तसेच अकोट फाइल भागातही अन्नधान्य पुरवून जेवण तयार करून देणाऱ्या युवकांना मदत देण्यात आली. या उपक्रमासाठी अकोला शहरातील गोरगरिबांना सुद्धा वाटप करण्यात आले. एमएसईबी अभियंता पतसंस्था व सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खुमकर यांचे सर्वत्र आभार व्यक्त होत आहेत.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement