पत्रकारावर जीवघेणा हल्ला म.रा.म पत्रकार संघांकडून दोषींच्या अटकेची मागणी
पत्रकारावर जीवघेणा हल्ला म.रा.म पत्रकार संघांकडून दोषींच्या अटकेची मागणी
ऑन लाइन दिले जिल्हधिकारी यांना निवेदन
अकोला:-
२८ एप्रिल निंबोरा येथील ग्रामीण पत्रकारावर आज
सकाळी जीवघेणा हल्ला झाला या घटनेत ते पत्रकार
गंभीर जखमी झाले या घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे अकोला जिल्ह्याच्या वतीने जाहीर तिव्र निषेध व्यक्तकरून हल्लाकरणाऱ्या हल्लेखोर यांचेवर कठोर कारवाईकरण्यात यावी अशीमागणी करीत आहे
वल्लभनगर जवळच निंभोरा हे गाव असून पद्माकर लांडे हे येथेच पत्रकारीता करतात. पद्माकर लांडे हे अकोला ते अकोट रोडने आपल्या दुचाकीने जात असताना हा हल्ला रेती माफीयाने केला त्यांच्यावर अचानक अज्ञात लोकांनी हल्ला चढविला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारार्थ रूग्णालयात हलविण्यात आले आहे या घटनेचा निषेध करून या प्रकरणाची चौकशी करून हल्लेखोर यांचेवर कठोर कारवाईची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विदर्भ उपाध्यक्ष संदीप पांडव, अमरावती विभागीय अध्यक्ष सिध्दार्थ तायडे यांचे मार्गदर्शनमध्ये अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजूशे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकार यांना ऑनलाइन निवेदन सादर करण्यात आले त्यांनी सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व सामाजिक अंतर या हेतूने सदर ऑनलाइन निवेदन स्वीकारून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.सदर निवेदनावर जिल्हा महासचिव श्रीकांत पाचकवडे , जिल्हा संघटक स्वाती सुरजूसे , सचिन मुर्तुडकर , बाळापूर तालुका अध्यक्ष पवन वानखडे ,पातूर तालुकाध्यक्ष डॉ. खुरसुडे , बाळापूर तालुका उपाध्यक्ष जाकीर अहेमद, सुरेश घ्यारे , अंकित क्रर्हे, पुरुषोत्तम घ्यारे यांची नावे आहेत.