शहरात अनेक ठिकाणी सांडपाण्याला अडथळा न.प.चे दुर्लक्ष...

शहरात अनेक ठिकाणी सांडपाण्याला अडथळा न.प.चे दुर्लक्ष... नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर...?


 आकोटः प्रतिनिधी घे सध्या कोरोना महामारी मुळे सर्वत्र आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच अकोट शहरात विविध ठिकाणी सांडपाण्याला अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती झाली आहे. काही ठिकाणी नाल्यांवर बांधकाम साहित्य बांधकाम धारकांनी टाकून ठेवले आहे. त्यामुळे घराघरातून निघणाऱ्या पाण्याचा पालीकेच्या सार्वजनिक नाल्यांमध्ये निचरा होत नसून त्यामुळे नाल्यांमधले पाणी नागरिकांच्या घरात शिरुन आरोग्याशी खेळ होत आहे. नाल्यांवर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळं नाल्यांमध्ये पाणी तुंबल्याने परिसरात घाण पाण्याने दुर्गंधी पसरली असून सांडपाण्यामुळे मच्छरांचा प्रकोप खूप वाढला आहे. सांडपाण्यातील मच्छरांमुळे डेंगू मलेरिया होऊ शकतो. कोरोना महामारी मूळ प्रशासन अधिकारी कर्मचारी आरोग्य विभाग जनतेच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत तर पावसाळा हा फक्त एक महिन्याच्या अंतरावर आला आहे.तर अवकाळी पाऊस होत आहे. अशातच सांडपाण्यामुळे आरोग्याची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची वाट संबंधित यंत्रणा बघत आहे का..? असा प्रश्न त्रस्त नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शहरातील मुख्य मार्गावर रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने काही बांधकाम धारकांनी आपले बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून ठेवलेले दिसून येत आहे, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन एखादी अप्रिय घटना झाल्यास जबाबदार कोण असा सवाल सामान्य जनता व सुज्ञ नागरिक विचारत आहेत.दरम्यान सराफ लाइन मधील सांडपाण्याची व रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत असल्याबाबतची तक्रार न.पा. मुख्यधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement