अंदुरा येथील दगड फेकीची पोलिसांकडून चौकशी
अंदुरा येथील दगड फेकीची पोलिसांकडून चौकशी
ठाणेदार विलास पाटील ताफ्यासह दाखल
अंदुरा: प्रतिनिधी
बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे शुक्रवारी झालेल्या दगड फेकीचे वृत्त शनिवारी प्रकाशित होताच.उरळ पोलिसांनी गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला,
याबाबत अधिक माहिती अशी की अंदुरा येथे शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास अचानक पाच ते सहा घरांवर अज्ञातांनी दगड फेक केली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नसली तरी मोठ्या
प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या बाबत शनिवारी दि.२५ रोजी वृत्त प्रकाशीत झाल्या नंतर सांयकाळी ८ च्या सुमारास उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले यात त्यांनी पीडितांशी संवाद साधून कोणी संशयित असल्यास नावे नोंदविण्याचे सांगितले. तशेच यातील दोषींची कुठल्याच प्रकारे गय केल्या जाणार नसण्याचे ते बोलले . या वेळी पोलीस पाटील ज्ञानदेव रोहनकार . सरपंच पती तथा ग्रा.प सदस्य संजय वानखडे. कोतवाल राजू डबेराव व ग्रा.प कर्मचारी राहुल भटकर उपस्थित होते.