दगडा च्या पावसाने गावकरी भयभीत
दगडा च्या पावसाने गावकरी भयभीत
अंदुरा येथील 10 च्या सुमारास घटना
अंदुरा: प्रतिनिधी
तालुक्यातील अंदुरा येथे एका भागात रात्री 10 च्या सुमारास अचानक काही घरांवर दगड फेक झाली यामुळे घरातील सदस्यांनी प्रचंड आरडाओरड केली व सर्व गाव जमा झाले.
अचानक झालेल्या दगड रुपी पावसामुळे संपूर्ण गाव भयभीत झाले. या बाबत अथिक महिती अशी की येथिल बस स्टँड लगत असलेल्या एका परिसरात नारायण तायडे यांच्या सह पाच ते सहा घरांवर अंदाजे रात्री 10 च्या सुमारास अचानक दगड फेक झाली, सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नसली तरी या घरातील सदस्याची आरडाओरड बघून संपूर्ण गाव जागे झाले,
सदर प्रकार हा गेला अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती उपरोक्तांनी दिली. मात्र आज अक्षरशः डगडांचा पाऊस आल्याची त्यांनी सांगितले. घटनास्थळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.मुंबई विदर्भ उपाध्यक्ष संदीप पांडव व बाळापूर तालुकाध्यक्ष पवन वानखडे यांनी भेट देऊन या बाबत उद्या उरळ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन सखोल चौकशी मागणी करण्याचे आश्वासन पीडितांना देऊन न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले..