चार दुकानावर दंडात्मक कार्यवाही करून 2600/- दंड वसूल

शिर्ला ग्रामपंचायत कोरोना पथकाची दंडात्मक कारवाई


चार दुकानावर दंडात्मक कार्यवाही करून  2600/- दंड वसूल 
नातिक शेख 
पातूर प्रतिनिधी -पातूर शहरात शिर्ला हद्दीतील मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार ज्या व्यक्ती च्या तोंडाला मास्क नाही  व मुक्त संचार करीत आहेत तसेच ज्या दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी नाही तरीही आपले दुकान सुरु ठेवणाऱ्या गुडलक स्वीट भांडार व्यवसायिक यास 2000₹ दंड व 3 नागरिक यांनी आपल्या तोंडाला मास्क न बांधल्या ने प्रत्येकी 200 ₹ प्रमाणे600 ₹ दंड केला .सदर कार्यवाही ग्रामपंचायत व  पोलीस प्रशासन मार्फत करण्यात आली आहे. ह्या दरम्यान सर्व शिरला ग्रामपंचायत हद्दीतील व पातूर येथील नागरिकांना अहवान करण्यात आले की अतिआवश्यक कामाकरिताच आपण आपल्या घराबाहेर निघा व बाहेर निघते वेळी मास्क अथवा रुमाल आपल्या तोंडाला बांधा व प्रशासनास सहकार्य करावे तसेच ज्या दुकानाला परवानगी आहे त्यांनीच आपले दुकाने सुरु ठेवावेत व विहित वेळेत बंद सुद्धा करावेत अन्यथा आपल्या विरुद्ध कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन शिरला ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी श्री राहूल उंदरे यांनी केले आहे कार्यवाही करते  वेळी पोलीस उप निरीक्षक श्री गोरे साहेब व राहुल उंदरे ग्राम विकास अधिकारी, अक्षय गाडगे सहाय्यक ग्रामसेवक ग्राम पंचायत शिरला . ग्राम पंचायत कर्मचारी,प्रमोद उगले, अंबादास इंगळे, चंद्रकांत धोटकर , गृहरक्षक दलाचे जवान,उमेश उंबरकार ,शुभम कळंबाडे ,सहदेव काळबांडे वाहन चालक हे उपस्थित होते.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement