पोलीस कर्मचाऱ्यांना इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीनेहोमिओपॅथिक औषधांचे वितरण
पोलीस कर्मचाऱ्यांना इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने
होमिओपॅथिक औषधांचे वितरण
अकोला - कोरोनाशी रस्त्यावर लढाई लढणारे सुरक्षा यंत्रणा कर्मचारी व इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक संस्थेची बांधिलकी असते असे सांगून पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हापासून बचाव करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांचे वितरण इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर मालोकार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सिटी कोतवाली ठाणेदार श्री उत्तम जाधव यांच्यापासून रेड क्रॉस सोसायटी च्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला संस्थेचे कोषाध्यक्ष एडवोकेट महेंद्र साहू, कार्यकारी सदस्य एडवोकेट सुभाष सिंह ठाकुर, होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर संदीप चव्हाण, पत्रकार तथा रेणुका मित्र मंडळाचे श्रीकांत जोगळेकर, मोहन काजळे , कच्छी मेमन जमात चे अध्यक्ष जावेद झकेरिया आदी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
अकोट मोटर स्टँड येथे रामदासपेठ चे ठाणेदार श्री मुकुंद ठाकरे यांच्या हस्ते उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना या होम्योपैथी औषधांचे वितरण करण्यात आले रेड क्रॉसच्या या उपक्रमाची ठाकरे यांनी प्रशंसा. केली आज दोन्ही ठाण्यातील ठिकाणी तैनात पोलिसांना या औषधांचे वितरण करण्यात आले असून तैनात सर्व पोलिसांना ते उपलब्ध करून देण्यात येईल असे मानद सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी कळविले आहे.