मनपा आयुक्‍त यांनी केली कंटेन्‍मेंट भागाची पाहणी

 मनपा आयुक्‍त यांनी केली कंटेन्‍मेंट भागाची पाहणी

वीडिओ देखने के लिए हमारे चैनल की लिंक पर किलिक करे

अकोला दि. 10 एप्रील 20 – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुविर दि. 10 एप्रील रोजी दुपारी मा.जिल्‍हाधिकारी, अकोला यांचे कडून प्राप्‍त अहवालानुसार अकोला महानगरपालिका क्षेत्रातील एकाच कुटुंबातील आणखी 4 जणांचे अहवाल पॉझेटीव्‍ह आले आहे, अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये  कोरोना बाधित असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या 6 झाली आहे.कोरोनाचा विषणूचा फैलाव अकोला शहरामध्‍ये वाढू नये तसेच  याबाबतच्‍या उपाययोजना अधिक प्रभावीपणे रोखण्‍यासाठी  आज स‍काळी मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी कंटेन्‍मेंट केलेल्‍या बैदपुरा भागातील पाहणी केली, तसेच कंटेन्‍मेट झोनमध्‍ये सेनीटायझेशचे काम जास्‍त प्रभावी करणे व त्‍या भागात राहणा-या नागरिकांची सर्दी, खोकला, ताप व ईतर आजारबाबतची तपासणी दररोज करण्‍याच्‍या सुचना संबंधीत विभाग प्रमुखांना मनपा आयुक्‍त यांनी दिल्‍या. व या परिवारातील रूग्‍ण हे परिसरातील कोण-कोणत्‍या नागरिकांच्‍या संपर्कात होते त्‍यांचाही शोध घेउन त्‍यांची तपासणी करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. याचसोबत कंटेन्‍मेंट भागातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तू जसे भाजीपाला, किरणा व ईतर वैद्यकीय सेवा याचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घेणे आदिंबाबत सुचना दिल्‍या. तसेच शहरातील सर्व नागरिकांना मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी घरातच राहण्‍यासाठी विनंती केली आहे. कंटेन्‍मेंट झोन व्‍यतिरीक्‍त नागरिकांनी सुध्‍दा घरातच राहावे खूप गरजेचे असल्‍यावरही फक्‍त जीवनावश्‍यक वस्‍तू घेण्‍याकरिताच नागरिकांनी सोशल डिस्‍टसींगचे नियमाचे काटेकोर पणे पालन करून, तोंडावर मास्‍क किंवा चांगला धुतलेला रूमाल बांधून व सेनीटायझारचा वापर करूनच वस्‍तू आणावी व प्रशासनास सहकार्य करावे.

       यावेळी क्षेत्रीय अधिकारी श्री विठ्ठल देवकते, श्री अजय गुजर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.फारूख शेख, विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे आदिंची उपस्थिती होती

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement