पत्रकार बांधवांना मास्क निर्जंतुकीकरण बॉटल हॅन्ड ग्लोज चे वितरण
पत्रकार बांधवांना मास्क निर्जंतुकीकरण बॉटल हॅन्ड ग्लोज चे वितरण
अकोला-संपूर्ण जगात वैश्विक महामारी कोरोना ने थैमान घातले आहे आपल्या देशातही करुणा चे संक्रमण प्रत्येक राज्यात पहावयास मिळत आहे सर्वधिक संक्रमण महाराष्ट्र राज्यात असल्याने या कोरोनाला हरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे अनेक उपाय योजना करण्यात येत आहे कोरोना च्या या लढाईत राज्य शासनासोबत प्रशासकीय यंत्रणा वैद्यकीय यंत्रणा व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपले योगदान देत आहे कोरोनापासून बचाव करिता पत्रकार बांधव जीव धोक्यात टाकून नागरिकांना मार्गदर्शन करीत आहे अशावेळी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय महासचिव जावेद झाकरिया अकोला जिल्हा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार संघ आणि अकोला इलेक्ट्रॉनिक मिडिया फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने मंगळवारी 21 एप्रिल ला शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी व्हिडीओ जर्नालिस्ट वृत्तपत्र फोटोग्राफर व फिल्डवर असणाऱ्या पत्रकार बांधवांना मास्क निर्जंतुकीकरण बॉटल हॅन्ड ग्लोज चे वितरण करण्यात आले.
सिटी कोतवाली चौकात संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात सोशल डिस्टन्स इंची अंमलबजावणी करीत पत्रकारांना सदर वितरण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा संख्या क विभागाचे महासचिव जावेद जकारिया अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल माहोरे,यावेळी ज्येष्ठ पत्रकार काजळे गुरुजी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार राजेंद्र किशोर श्रीवास धनंजय साबळे कुंदन जाधव सुरेश राठोड अक्षय गवळी संतोष चक्रनारायण जय गावंडे नीरज भांगे,अकोला इलेक्ट्रॉनिक मीडिया फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक राऊत उपस्थित होते.