कापूस खरेदी जोमात गावकरी कोमात !
कापूस खरेदी जोमात गावकरी कोमात !
सरपंच पोलीस पाटलांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
अंदुरा: प्रतिनिधी
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत सुरू असुन अशात काही प्रमानात लॉक डाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात आली , यात कापूस खरेदीचाही समावेश आहे , ही खरेदी गावांत जरी जोमात सुरु असली तरी कापूस घेणारे व भरणारे बाहेर गावावरून येत असल्यामुळे गावकरी मात्र कोमात जात असल्यची परिस्थिती सध्या गावात आहे.
20 तारीखपासुन कापूस खरेदी सुरु झाली असुन त्याअनुषंगाने गावात व्यापारी , मापारी तसेच गाड्या भरणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. पाच ते सात हजार लोकसंख्या असलेल्या गावात आजपर्यंत काटेकोरपणे लॉक डाऊनचे पालन करण्यात आले मात्र आता या बाहेर गावावरूण येणाऱ्याकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत विशेष म्हणजे सरपंच पती तथा ग्रा.प.सदस्य संजय वानखडे , पोलीस पाटील ज्ञानदेव रोहनकर तसेच कोतवाल राजु डाबेराव. यांनी गावातील व्यापारी तसेच बाहेरील मापारी सर्वांना लॉक डाऊन बाबत व नियमांबाबत अवगत करुन दिले आहे. त्या नुसार बाहेरून येणाऱ्या कामगारांनी हाथ स्वच्छ धुणे , तोंडला मास्क बांधणे आदी सूचना नियमांचे पालन करने गरजेचे आहे मात्र गावात तसे होतांना दिसत नसल्याने गावकरी भेदारलेल्या अवस्थेत आहेत.
आजपर्यंत नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे ग्रामस्थ मात्र आता काळजीत पडले आहेत, कापूस विकणे आवश्यक यात दुमत नाही मात्र लॉक डाऊन दरम्यान असलेल्या नियमांच्या चौकोटीत राहून जर हे झाले नाही व याचे परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागले तर जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.अशात कापूस खरेदी सुध्दा ही भाव पाडून घेतल्या जात असल्यची चर्चा आहे, मात्र आर्थिक नळ असल्याने शेतकरी सध्या पडय़ा भावत कापूस देत असुन या व्यापाऱ्याकडून एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट होत आहे..