देशव्यापी लॉक डाउनच्या दरम्यान फ्लाईंग कलर्स एजुकेशन फॉउण्डेशन अकोला द्वारा अन्नावितरण



देशव्यापी लॉक डाउनच्या दरम्यान फ्लाईंग कलर्स एजुकेशन फॉउण्डेशन अकोला द्वारा अन्नावितरण

रोटी बैंक द्वारा गरीबांना रोज दिल्या जाते अन्न!

 निज़ाम साजिद 
अकोला-देशात कोरोना वायरस ने हाहाकार माजवला असताना तसेच दिनांक 22 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली आहे .अशा परिस्थितीत घरा बाहेर निघणे अतिशय कठिन  असताना  फ्लाईंग कलर्स एजुकेशन फाउंडेशन, अकोला द्वारे ऐमरजंसी राशन कीट( मोफत अन्नाचे) वितरण गरजू ,गरीब आणी रुग्नणाना करण्यात येत आहे या राशन किट मधे जीवनावश्यक वस्तु जसे गहु , तांदूळ,तेल, मिर्ची मसाला,मीठ इत्यादि वस्तु गरजवंतां पर्यंत पोहचविन्यात  येत आहे.  हे कार्य शहराच्या विविध 11 जोन मधे  करण्यात येणार आहे.
 तसेच या संस्थे द्वारे रोटी बैंक नावांचा अभिनव उपक्रम गेल्या वर्षाभरा पासून सतत सुरू आहे . संस्थेचे पदाधिकारी, समाज सेवक, सेवभाविच्या मदतिने संस्थेच्या वहानातुन जिल्हा सामान्य रुग्णालय,  लेडी हार्डिंग ,बस स्टैंड, रेलवे स्टेशन बाजार इत्यादि ठिकाणी गरीब मजदूर आणी पीड़ित लोकांना दर दिवशी दिवशी अन्नाचा पुरवठा करण्यात येतो संस्थेचे या सामाजिक सेवा व उपक्रमाची दखल विविध सामाजिक संस्था , वर्तमानपत्र , मीडिया द्वारे घेण्यात  येत आहे
अध्यक्ष डॉ. ज़ुबैर नदीम ने दिली तसेच समाजातिल उच्चवर्गच्या लोकांना अपील  केली  आहे की देशांत उभे ठाकलेल्या  संकटाचा सामना करन्यासाठी संस्थच्या ह्या समाजसेवच्या  कार्यात भाग घेऊन तसेच आर्थिक मदत द्वारा जनतेने योगदान द्यावे .ह्या समाजउपयोगी कार्यात मा. जिल्हा अधिकारी , जिल्हा पोलिस अधिकारी व प्रशासनाचे वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याचे त्यांनी आभार मानले आहे.  तसेच ह्या सामाजिक कार्यात अहोरात्र झटनाऱ्या पदाधिकारी तसेच सदस्य  सचिव डॉ सरोश उर रहमान खान, डॉ मुजाहीद अहमद, रियाज अहमद सर, अब्दुल रहीम सर,रीजवान जमील खान, उबैद उल्लाह खान, सैयद मोहसीन अली,उबैद काजीम, नवाब अली,आदील अशहर योगदान उल्लेखनीय आहे.
https://youtu.be/oYu8kYHRZQw
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement