शाळांमधील उरलेले शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करावे

शाळांमधील उरलेले शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करावे -                                                                        विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांची जिल्हाधिकार्‍यांना मागणी

अकोला :- जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळांमधील शासना मार्फत पुरविल्या जाणारे शालेय पो
षण आहार सध्या परिस्थितीत कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे शाळांना सुट्टी लागल्याने सदर पोषण आहार हे तसेच पडून आहेत त्यामुळे सदर पोषण आहार हे खराब होण्याअगोदर संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याचे वाटप करावे अशी मागणी अकोला महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
          जगभरात थैमान माजलेल्या कोरोना या भयावह विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण देशात सरकारने 21 दिवसांचा बंद केला आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचे मोठे परिणाम होत असल्याचे दिसत आहेत.  शासनामार्फत शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्यात येत असते परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण शाळांना सुट्टी देण्यात आली आहे त्यामुळे सदर पोषण आहार हे त्या शाळेत तसेच पडून आहेत. येत्या काळात सदर पोषण आहार सडू नये, तसेच संबंधित हक्कदार असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावे याकरिता जिल्ह्यातील शाळेच्या शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या हक्काचे असलेले पोषण आहार वितरित करावे अशी मागणी गुरुवारी अकोला महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली यावेळी त्यांच्यासोबत मोहम्मद युसुफ, नगरसेवक मोहम्मद इरफान, मोईन खान, महेमुद खान हे उपस्थित होते.https://youtu.be/oYu8kYHRZQw
Next Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement