महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अकोला जिल्हा महासचिव पदी श्रीकांत पाचकवडे यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अकोला जिल्हा महासचिव पदी श्रीकांत पाचकवडे यांची नियुक्ती
निज़ाम साजिद
अकोला : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अकोला जिल्हा महासचिव पदी श्रीकांत सुरेशराव पाचकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष किरण जोशी यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारीता, सामाजीक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात श्रीकांत पाचकवडे हे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विदर्भ उपाध्यक्ष संदीप पांडव,अमरावती विभागीय अध्यक्ष सिधार्थ तायडे यांनी त्यांची जिल्हा महासचिव या पदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील पत्रकारांच्या अडचणी, त्यांच्या समस्या सोडविण्यासोबतच समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.https://www.youtube.com/channel/UCzCPuAqvk0CsMjqrjgtJPFQ