दिव्य मराठी विरुद्ध दाखल गुन्हा परत घेण्यात यावा
दिव्य मराठी विरुद्ध दाखल गुन्हा परत घेण्यात यावा
महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघ शाखा अकोलाची मागणी
अकोला:-औरंगाबादेत दिव्य मराठी टीमवर गुन्हा दाखल झाला . कोरोनाच्या निराकारणात प्रशासन कमी पडतय त्या बद्दल प्रश्न विचारणाऱ्या प्रसार माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे . पत्रकार आणि पत्रकारिता करणारी प्रसार माध्यमे खरी वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठी स्पष्टपणे आपली मतं प्रसार माध्यमातून मांडत असतात . प्रशासन आणि इन्वेस्टिगेशन संस्था तपास करण्यासाठी सुसज्ज असतात आणि त्यांना पत्रकारितेची मदत हवी असते.परंतु पत्रकारितेचा आवाज दाबविणे हा अन्याय आहे . सदर निवेदन तहसीलदार साहेब मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयाना देनयात आले. तरी या निवेदन द्वारे महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघाची अशी मागणी आहे की दिव्य मराठी विरुद्ध दाखल झालेली गुन्हे परत घेण्यात यावी . सदर बाबतीत महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष जमील अहेमद शेख यांच्या मार्गदर्शनात जिलाध्यक्ष मोहम्मद फ़रहान अमिन,उपाध्यक्ष असरार हुसैन, जिल्हा सचिव शेख लुकमान, जिल्हा सल्लगर शेख मुख्तार सर,कायदेशीर सल्लागार ऐड सय्यद शोएब सालार,पातुर तालुका अध्यक्ष नातिक शेख यांच्या ऑनलाईन झालेल्या मीटिंग मध्ये निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला व पातुर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी जिल्हाध्यक्ष मोहम्मद फ़रहान अमिन, जिल्हा सल्लगर शेख मुख्तार सर, पातुर तालुका अध्यक्ष नातिक शेख आदि उपस्थित होते