वाहतुक पोलिसांना आयुर्वेद काढ्याचे वाटप
वाहतुक पोलिसांना आयुर्वेद काढ्याचे वाटप
अकोला - कोरानाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैद्यकीय उपाययोजना म्हणून अकोल्यातील सुप्रसिध्द आयुर्वेद चिकित्सक, नाडीपरिक्षण तज्ञ वैद्य सचिन उर्फ नाना म्हैसणे यांच्या तर्फे अकोला वाहतुक पोलीस शाखेच्या अधिकारी व कर्मचाNयांना प्रतिकारक्षमता वाढविणारा आयुवैद औषध काढा वाटप करण्यात आला. प्रतिकारक्षमता वाढविण्याखेरीज आगामी पावसाळ्यात वाढणारे सदीa, ताप, दमा या त्रासाला हा काढा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उपयोगी ठरणार आहे.
स्थानिक वाहतुक पोलिस शाखेच्या कार्यालयात व शहरातील प्रमुख चौकात पोलीस निरिक्षक तथा वाहतुक शाखेचे अधिकाररी गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात हा छोटेखानी काढा वाटपाचा कार्यक्रम शारीरीक अंतर राखत पार पडला. यावेळी वाहतूक पोलिस शाखेचे कर्मचारी दिपक सोनकर, विजय अदापुरे, श्रीकृष्ण पवार, मंगेश गिते, विशाल पांडे, कृष्णा मुंढे, उमेश इंगळ उपस्थित होते. वैद्य सचीन उर्फ नाना म्हैसणे यांनी यावेळी आयुवैद काढ्याच्या सेवनाचे महत्व विषध केले. ठिकठिकाणच्या चौकातील या छोटेखानी काढा वाटप कार्यक्रमात म्हैसणे यांच्या श्री विश्वमाउली आयुवैद चिकित्सालय व पंचकर्म केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी अंकीत तायडे, शुभम नागोलकर, आदीत्य माहूलकर सहभागी होते. प्रतिनिधीक स्वरूपात काढ्याचे वितरण झाल्यानंत उर्वरीत पोलीस कर्मचाNयांसाठी काढा पाकीटे वाहतुक पोलीस अधिकारी गजानन शेळके यांच्याकडे सुर्पूद करण्यात आली.