पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक सामुग्री चे वितरण
पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक सामुग्री चे वितरण
अकोला - कोरोना संक्रमणाच्या काळात प्रिंट व इलेक्ट्रानिक मिडियाचे पत्रकार वृत्त संकलनासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत , याची जाणीव ठेऊन अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे रेडक्रॉस सोसायटी व आय एम सी सी चे गिरीश तोषणीवाल यांनी पत्रकारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सनीटायझर , रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्या व आयुष मंत्रालयाने निर्देशित केलेला काढा या कोरोना प्रतिबंधक सामुग्री चे वितरण जिल्हा पत्रकार संघाच्या ओपन थीएटर जवळील कार्यालयासमोर फिजिकल डिस्टेन्सिंग चे पालन करून पत्रकारांना वितरित करण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा ,अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब , सरचिटणीस प्रमोद लाजूरकर , रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजितसिंह बछेर यांच्या हस्ते पत्रकारांना ह्या वस्तूंचे वितरण करण्यात आले , कोरोना पासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकांच्या हिता करिता सर्वांनी उपाय योजना मध्ये सहकार्य करावे अशी विनंती अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे या वेळी करण्यात आली ,
या प्रसंगी गजानन राऊत , दीपक देशपांडे , राजेंद्र श्रीवास , अकबर खान, निलेश धाडीकर , कमलकिशोर शर्मा , मनीष खर्चे, बंटी नांदुरकर , इमरान खान, दीपक कोकाटे सुधाकर देशमुख ,अंतरराष्ट्रीय माहेश्र्वरी कपल क्लब चे गिरीश तोषणीवाल , सुनील नावंधर, निशित गांधी, योगेश बाहेती, कपिल लढ्ढा, संजय गांधी , आदी उपस्थित होते , सामाजिक बांधिलकीच्या भावनेने कार्य करणाऱ्या रेड क्रॉस सोसायटी चे व आय एम सी सी चे जिल्हा पत्रकार संघातर्फे आभार मानण्यात आले ,