लॉक डाऊन तीन च्या काळात शहर वाहतूक शाखेने 15 हजार वाहनांवर केली दंडात्मक कार्यवाही
तीन लॉक डाऊन च्या काळात शहर वाहतूक शाखेने 15 हजार वाहनांवर केली दंडात्मक कार्यवाही
दीड हजार वाहने केली तात्पुरती जप्त
अकोला- कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व संक्रमण कमी व्हावे म्हणून सरकारने 24 एप्रिल पासून लॉक डाऊन ची घोषणा करून अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण लॉक डाऊन ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपीविली होती तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले होते ,लॉक डाऊन च्या जवळपास 50 दिवसाच्या काळात अकोला पोलीस सतत अकोलेकर ह्यांना अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत होते, लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांनी शहर वाहतूक शाखेला दिले होते त्याची कडक अमलबाजवणी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे सहकारी सतत कार्यरत होते ह्या काळात शहर वाहतूक शाखेने धडक कार्यवाही करून कागदपत्र जवळ न बाळगणाऱ्या व विनाकारण वाजवी कारणा शिवाय फिरणाऱ्या 15 हजार पेक्षा जास्त वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला व दीड हजार पेक्षा जास्त वाहने तात्पुरती जप्त करण्यात येऊन 7 दिवसा नंतर सोडण्यात आली तर एक पेक्षा जास्त वेळ डेटेंड केलेली वाहने लॉक डाऊन संपे पर्यंत शहर वाहतूक शाखेत डेटेंड करून ठेवण्यात आली। वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करतांना व तात्पुरती जप्त केलेली वाहने सोडतांना अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक कर्मचारी वाहन धारकांना करीत होते पण ह्या आवाहनाला प्रतिसाद न देता मोठ्या संख्येने नागरिक घरा बाहेर पडत असल्याने अकोला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे, ह्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, आपल्या वाहनांचे कागदपत्र तसेच परवाने जवळ बाळगावे एकदा डेटेंड केलेले वाहन 7 दिवस सोडण्यात येणार नाही तसेच ही वाहने लॉक डाऊन संपे पर्यंत सुद्धा अडकवून ठेवण्यात येऊ शकतात तरी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे.