लॉक डाऊन दरम्यान शहर वाहतूक शाखेकडून एक हजार पेक्षा जास्त वाहने जप्त
लॉक डाऊन दरम्यान शहर वाहतूक शाखेकडून एक हजार पेक्षा जास्त वाहने जप्त
अकोला वासीयांचे 'हम नही सुधरेंगे हेच धोरण कायम'
अकोला- शहरात दररोज कोरोनाचे तांडव सुरू आहे, दररोज पोसिटीव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे, करोना ग्रस्त रुग्णाचे अर्ध शतक ओलांडले आहेत, आज शहराच्या चारही दिशेला करोना रुग्ण आढळून आल्याने, शहराचा कोणताही भाग आज सुरक्षित नाही, प्रशासना तर्फे वारंवार नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे, परंतु हम नही सुधरेंगे च्या धर्तीवर अकोलेकर प्रशासनाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून प्रशासना कडून दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन अगदी छोट्यामोठ्या कारणाने वाहना सह बाहेर पडून मुक्त संचार करीत असल्याने अश्या वाहन धारकावर जरब बसावी म्हणून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक शाखा प्रमुख गजानन शेळके आपल्या कर्मचाऱ्यासह दररोज रस्त्यावर उतरून आपल्या जवळ वाहनांचे कागदपत्र न बाळगणाऱ्या व कोणतेही वाजवी कारणा शिवाय फिरणाऱ्या जवळपास 1100 वाहन धारकांची वाहने जप्त करून शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आली तसेच लॉक डाऊन च्या काळात कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या 10500 वाहन धारकावर विविध कलमान्वये दंडात्मक कार्यवाही करून 8 लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, एवढ्या मोठ्या संख्येने दंडात्मक कार्यवाही व वाहने जप्त करूनही अकोला शहर वासी सुधारण्याचे नाव घेत नाहीत, अकोले कारांची हीच वृत्ती कायम राहिली तर भविष्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्या शिवाय राहणार नाही हे नक्की