बैदपुरा येथे 200 नागरिकांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी
बैदपुरा येथे 200 नागरिकांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी
अकोला– अकोला शहरातील कोरोना बाधित रूग्णांपैकी सर्वात जास्त रूग्ण हे बैदपुरा परिसरातील आहे, तसेच या क्षेत्रामध्ये रूणाच्या मृत्युचा दर सुध्दा वाढलेला असून अकोला शहराची वर्गवारी आता रेड झोन मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे व लॉकडाउनचा अवधीही वाढविण्यात आला आहे. तसेच या परिस्थिती मध्ये सुधार न झाल्यास भविष्यामध्ये कोरोनाची लागण/मृत्यु तसेच लॉकडाउनच्या कालावधीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना बाधीत क्षेत्रामधील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेउन कोरोना सदृश्य लागण झालेल्या नागरिकांची माहिती महानगरपालिका प्रशासनाला देणे खूप गरजेचे आहे मात्र अशी माहिती लपवून ठेवल्यास किंवा सरकारी यंत्रणेला सहकार्य न केल्यास कोरोना रूग्णांची संख्या व मृत्युदर दिवसेंदिवस वाढणार आहे. या पार्श्वभुमिवर कोरोना विषयक जनजागृती व कोरोना निर्मुलनाकरिता नागरिकांचा सहभाग असणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने बैदपुरा व शहरातील खाजगी डॉक्टर्स, मेडीकल दुकान चालक व समाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने अकोला महानगरपालिका व्दारे काल दि. 3 मे रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत स्थानिक फतेह चौक सांगलीवाला शोरूम जवळ प्राथमिक आरोग्य तपासणीचे कामास सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये बैदपुरा येथील सर्व नागरिकांची सर्दी, ताप, खोकला व घसादुखी सारख्या आजारांची तपसणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे व याव्दारे काल एकुण 200 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे तसेच आवश्यकता भासल्यास या नागरिकांना अलगीकरण करणेकरिता रामदास पेठ येथील आबासाहेब खेळकर सभागृह व जि.प.उर्दु शाळा येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.अकोला शहरातील सर्व नागरिकांना मनपा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येत आहे कि, अकोला शहरामध्ये कोरोना विषणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपणकडे जर कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती असल्यास त्वरीत अकोला महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांक व हेल्पलाईन नंबर 18002335733, 0724-2434412, 0724-2423290, 0724-2434414, 0724-2430084 या नंबरांवर देउन सहकार्य करावे ही विनंती. माहिती देणा-याचे नांव पुर्णपणे गुप्त ठेवण्यात येणार आहे.
या शिबीरामध्ये नगरसेवक डॉ.झिशान हुसैन, डॉ.नजर शेख, डॉ. इमरान अहमद, डॉ.इमरान तैबानी, डॉ.दाउद आमीन, डॉ.सादिक, डॉ.अहमद, डॉ.मिर्झा, डॉ.वासिक अली, डॉ.फराज, डॉ.शहजाद, डॉ.शाकीर पठाण, डॉ.अजहर परवेज, डॉ.आसिफ हालादी, डॉ. असलम यांच्या व्दारे तपासणीचे काम करण्यात येत आहेत. तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते मेहबूब खान (मब्बा पहेलवान), हाजी मदाम साहेब, जावेद खान मिया खान, मजहर खान, शकूर खान लोधी, सलीम खान, प्रमोद कृपलानी (वर्षा मेडीकल) कच्ची मेमन जमातचे अध्यक्ष श्री जावेद जकेरिया, बिलाल ठेकीया, शफी सुर्या, अनीस हालारी, मुश्ताख रस्सीवाला, फिरोज दर्या, संजरी पेन्ट्स, आदिंचे मोलाचे सहकार्य भेटले आहे.